October 11, 2026

करमाळ्याच्या सिद्धी देशमुखचे  अबॕकस मध्ये घवघवीत यश ; भारतातील सगळ्यात लहान अबॅकस ग्रॅज्युएट होण्याचा मिळाला मान

0
IMG-20250206-WA0013.jpg

करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)-
प्रोऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अबॅकस ची राष्ट्रीय परीक्षा २२ डिसेंबर रोजी सोलापूर येथे घेण्यात आली. या परीक्षेला एकूण १५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

त्यामध्ये कमलाई अबॅकस क्लासेस करमाळा च्या एकूण ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये सिद्धी पृथ्वीराज देशमुख आणि दिक्षा दत्तात्रय दिवटे या दोघीनी अबॅकस ग्रॅज्युएशन ची फायनल परीक्षा दिली.
यामध्ये दोघी उत्तम गुणांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. अगदी कमी वयात वय वर्ष १० मध्ये अबॅकस ग्रॅज्युएशन करणारी प्रो ऍक्टिव्ह अबॅकस कंपनी मधील भारतातील पहिली विद्यार्थिनी ठरली. यामुळे कंपनीने सिद्धी देशमुख तसेच दिक्षा दिवटे या दोघीना देखील सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

कंपनीचे डायरेक्टर गिरीश करडे सर व कंपनीच्या HOD तेजस्विनी सावंत मॅडम या दोघांनी ही दोन्ही विद्यार्थिनीचे तसेच कमलाई क्लासेस करमाळा चे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page