10/06/2026

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी

0
IMG-20250208-WA0050.jpg

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी बोलताना किशोर कदम म्हणाले की, त्याग मूर्ती रमाई लग्न करून बाबांच्या जीवनी ती आली गरिबीमुळे कधी नटली ना सजली कधी हट्ट ना कधी रुसली, फुगली बाबांच्या संसारात झाली प्रकाशमय समई अशी होती माझी त्यागमुर्ती रमाई. संसार केला तिने शेण गोवऱ्या थापून पूर्ण होण्या बाबांचे शिक्षण सोसले तिने हलाखीचे जीवन कधी वेळेवर मिळाले नाही जेवण दीनदुबळ्या लेकरांचे भरण्या पोट झाली दुधावरची साई अशी होती माझी त्यागमुर्ती रमाई.

प्रज्ञा सूर्याची झाली ती सावली बाबांच्या पाठी खंबीर उभी राहिली गेले डोळ्यादेखत लेकरांचे प्राण उरला नाही अंगामधे त्रान भिमलेखणीची झाली ती शाई अशी होती माझी त्यागमुर्ती रमाई. माझ्या भीमाची सावली दीनदलीतांची आई अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी रमाई असे म्हणतात तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्ये त्यागमुर्ती रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे रमाई मातेला जयंती निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, धन्यकुमार गारुडी, निलेश पाटील, किशोर कदम, हेमंत शिंदे, अतुल निर्मळ, पिंटू जाधव, सचिन गारुडी इत्यादी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page