करमाळा शहरातील विविध समस्या मार्गी लावाव्यात अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल- सरचिटणीस जितेश कटारिया

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)-
शहरातील विविध समस्या मार्गी लावाव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरचिटणीस जितेश कटारिया यांनी दिला आहे.
करमाळा शहरातील विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने मुख्याधिकारी करमाळा यांना भारतीय जनता पार्टी करमाळा यांच्या वतीने जितेश कटारिया सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच अनेक रस्त्यांवर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे विचित्र चढ उतार,शहराच्या कडेने असलेल्या रस्त्याच्या बाजूने साचलेला कचऱ्याचा ढीग, तुंबलेल्या गटारी ची स्वच्छता करणे, मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा बंदोबस्त ,धुळीमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम आदी समस्यावर तातडीने नगर परिषदेने कारवाई करून ठोस पावले उचलावीत अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने येणाऱ्या दहा दिवसांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य दीपक चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, किसान मोर्चाचे सरचिटणीस नरेंद्र ठाकूर, महिला शहराध्यक्ष रेणुका राऊत, ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, राहुल रामदासी, प्रदीप देवी, सचिन चव्हाण आदी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.