जेऊर येथे गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जेऊर येथील गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य फुल पीच टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचे हे तिसरे वर्ष आहे.
छत्रपती चषक २०२५ ही स्पर्धा शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने युट्युब वरून लाईव्ह पाहता येणार आहेत.
स्पर्धेतील बक्षीसे पुढीलप्रमाणे-
१) प्रथम बक्षीस- १,०१,१११/- आणि ट्रॉफी– गजराज प्रतिष्ठान जेऊर
२) द्वितीय बक्षीस- ७१,०००/- आणि ट्रॉफी– स्पेक्ट्रम मार्केटींग, छत्रपती फाउंडेशन
३) तृतीय बक्षीस- ५१,१११/- आणि ट्रॉफी– महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे
4) चतुर्थ बक्षीस- ३१,१११/- आणि ट्रॉफी– तुकाराम चोरगे व समाधान देशमुख
तसेच सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे.
सदरील बक्षीस वितरण २५ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना झाल्यावर होणार असल्याची माहिती गजराज प्रतिष्ठानचे राहुल घोरपडे, शरद वाघमोडे, भारत पाटील, इकबाल पठाण, दीपक सुरवसे यांनी दिली आहे. स्पर्धेतील सर्व सामने जेऊर येथील मार्केट यार्ड येथील मैदानावर होणार आहेत.







