10/06/2026

केत्तूर येथील श्री किर्तेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री निमित्त शिवमहापुजेचे आयोजन

0
IMG-20250216-WA0013.jpg

केत्तूर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
केत्तूर येथील पुरातन व प्रसिध्द असलेल्या श्री किर्तेश्र्वर देवस्थान येथे २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सह शिवमहा पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

योगीराज गुरुवर्य हभप रणजीत बापू यांच्या कृपा आशीर्वादाने व तमाम श्री किर्तेश्वर भाविक भक्तांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२१ फेब्रुवारी ते दि.२८ फेब्रुवारी या दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे.

पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ८, श्री किर्तेश्वर अभिषेक, सकाळी १० ते दुपारी १ शिवमहापूजा, दुपारी २ ते ५ शिवलीला आमृत ग्रंथाचे आर्थासहित पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत हरीकिर्तन,रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत हरी जागर अशी कार्यक्रमाची रूपरेषा असून पंचक्रोशीसह तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page