जेऊर : अल्फा पठाण या आठ वर्षीय मुलीचा पहिला रोजा पूर्ण


जेऊर, दि. ११ (गौरव मोरे)-
जेऊर येथील सद्दाम पठाण यांची इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी मुलगी अल्फा (वय-८) हीने पहिला रोजा पूर्ण केला आहे
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून, काल १० रोजे (उपवास) पूर्ण झाले आहेत. यंदाही रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळपास १४ ते १५ तास राहण्याची शक्तीच जणू देव या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते. त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो. जेऊर येथील अल्फा ने रोजा ठेवला आणि संपूर्ण १४ तास निर्जली राहिली, त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
अल्फा ही आष्टी येथील अनिशा ग्लोबल स्कूल मध्ये शिकत आहे.




