06/06/2025

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन ; इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

0
119f6cd55b924921801e8964693caddd.jpg

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेड तर्फे रमजान पवित्र महिण्यानिमित्त अलिफ मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, संभाजी ब्रिगेड ही संघटना सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित घेऊन चालणारी आशी एकमेव संघटना आहे. सर्व जातीतील लोकांना एकत्रित घेऊन काम करणारी व विचारधारेवर सर्व समाज बांधवांचं संघटन करणारी संघटना आहे. व काही समाजकंटक जाती जातीमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजकंटकांचा वापर करीत आहे.

तरी काही समाज बांधवांनी अशा चेतावणी कोर लोकांपासून सर्व समाज बांधवांनी सावध राहावे. हा द्वेष रोखण्याचं काम व जातीय सलोखा राखण्याचे काम गेली कित्येक वर्षापासून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही संघटना काम करत आहे.

यावेळी या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, बाळासाहेब झोळ, निलेश पाटील, तालुकाध्यक्ष सुहास पोळ, शहअध्यक्ष अतुल निर्मळ, पिंटू जाधव, आजिनाथ माने, धनंजय गारुडी, सचिन कसबे, सागर कोठावळे, सागर साखरे,अजित उपाध्ये,अविनाश घाडगे, विठ्ठल जाधव, बनकर, नाना साहेब पोळ,अशितोष कसबे आदी कार्यकर्ते व बहुसंख्येने सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page