जेऊर येथे बँक आॕफ इंडियाची शाखा लवकरच सुरू होणार ; जेऊर परिसरातील ग्राहकांना दिलासा- स्टेट बँकेच्या कारभाराला वैतागले होते ग्राहक

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे बँक आॕफ इंडियाची शाखा लवकरच सुरू होणार असून आजपासून बँकेचे वेगवेगळी खाते सुरू करण्यासाठी अधिकारी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे जेऊर परिसरातील तब्बल तीस गावातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
जेऊर येथे कित्येक वर्षांंपासून फक्त स्टेट बँक ही एकच बँक होती बँकेच्या कारभाराला परिसरातील नागरिक वैतागून गेलेले होते अशातच बँक आॕफ इंडियाची शाखा सुरू झाल्यामुळे आता नागरिकांना पर्याय उपलब्ध झालेला आहे.
बँकेची शाखा करमाळा रोडवरील इंदिरा नगर येथील प्रितम हॉटेलच्या वरील बाजूस सुरू होणार असून येथे आजपासून बँकेचे अधिकारी बँकेच्या विविध खात्यांची व ऑफर्सची माहिती देऊन आपले खाते उघडून देतील.
खालीलप्रमाणे खाते उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रे-
1. बचत खाते
– आधार कार्ड , PAN मुळ प्रत व त्याची झेरॉक्स
– २ फोटो
2. चालू खाते (Current Account)
– आधार कार्ड,PAN card मुळ प्रत व त्याची झेरॉक्स
– उद्यम आधार झेरॉक्स
– २ फोटो