06/06/2025

वांगी-३ : पाटील गटाची प्रचारात आघाडी ; विरोधक बॕकफुटवर

0
IMG-20250411-WA0015.jpg

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-
जुन्या लोकांनी उभारलेल्या संस्थेस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निवडणुक लढवित असुन मतदार ‘कपबशी’ समोरच शिक्का मारतील असा विश्वास आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवला.

वांगी नं ३ येथील सभेत ते बोलत होते. श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’च्या प्रचाराची सभा वांगी नं ३ येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सुधीरमाऊ रोकडे होते तर व्यासपीठावर करमाळा नगरपरीषदेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, पांडूरंग देशमुख, माजी जि प अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, दत्तात्रय आरकीले, माजी सभापती गहीणीनाथ ननवरे, दिपक देशमुख, अजितदादा तळेकर, पोपटदादा सातव, माजी संचालक बापूराव आणा देशमुख, देवानंद बागल, नानासाहेब गोडगे, दत्तात्रय बापू रणसिंग, विशाल तकीक, शेखर तात्या गाडे, धनंजय गायकवाड, विकास गलांडे- (सरपंच) मामा सांगावे, मौलाभाई मुलाणी- सरपंच, तानाजी देशमुख, गणेश चौधरी, राव काका देशमुख, नितिनदादा हिवरे, दंसू बापू देशमुख, विहुल शेळके, हिरा चौगुले, विकास अमृळे, विनोद गरड, श्रीहरी कदम, अखलाख जहागीरदार, गणेश जाधव, बाबूदादा रोकडे, अमर आरकीले, भुजंगराव जाधव, बापूराव आरकीले, धनूबापू निंबाळकर, गणेश पाटील,
बाबूभाई जहागिरदार, अर्जुन आबा तकीक, वैभव पाटील, भाऊसाहेब तावसे, विकास पाटील, अशोक वाघमोडे, गोपाळ रोकडे, बापू गोडसे आदिसह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, सभासदांनी स्वतःचा मालकी हक्क टिकवून ठेवण्यासाठी हि निवडणुक हाती घ्यावी. उजनी परिसरातील वीज, पाणी व रस्ते याबाबतीत मी कधीही कमी पडलो नाही. या भागातील‌ शेतकऱ्यांना शेतीपुरक मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या पदावर असो त्या पदावरुन न्याय दिल्याने सभासद‌ मतदार आमच्या पॅनलला विश्वासाने मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर मोहिते पाटील व आमच्यात विकासकामा बाबत एकवाक्यता होती असे सांगुन करमाळा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की जगताप कुटुंबातील सदस्यांना या तालूक्याने अनेक वर्ष विश्वास ठेऊन सत्ता दिली. माझे आजोबा देशभक्त स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार नामदेवराव जगताप व वडील माजी आमदार जयवंतराव जगताप साहेब यांनी नेतृत्व करत असताना त्यावेळी भविष्याचा विचार करुन अनेक कामे केली. यात उजनी, कुकडी पासून अनेक कामे आहेत. आज आमदार म्हणून जनता नारायण आबांवर प्रेम करते व आमदार नारायण आबा पाटील विकासकामात कुठेही कमी पडत नाहीत. आदिनाथ कारखान्यास गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही नारायण आबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची जगताप यांनी सांगितले.

प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले तर यावेळी बापुराव देशमुख, देवानद बागल, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर आदिंची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार नाना गोडगे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page