जेऊर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी



जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)-
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महापुरूषांची पुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती अतुल पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, माजी सरपंच भास्कर कांडेकर, माजी सरपंच अनिल गादिया, ग्रामपंचायत सदस्य धनंजय शिरसकर, संदीप कोठारी, विनोद गरड, सागर भगत, शांताराम सुतार, सुयोग दोशी, उमेश कांडेकर, अंगद गोडसे, सचिन निमगिरे, तसेच सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व जेऊर ग्रामस्थ उपस्थित होते.
जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमासाठी सकल माळी समाज व जेऊर ग्रामस्थ तसेच राष्ट्रीय समर्पण पुरस्कार विजेते महेश रणदिवे यांनी परिश्रम घेतले.





