जेऊर येथील सौ. किरण वळेकर यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च असा MDRT 2024 पुरस्कार जाहीर – सलग चौथ्यांदा होणार सन्मान

जेऊर, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एलआयसी (LIC) चे मुख्य आयुर्विमा सल्लागार धनंजय वळेकर यांच्या पत्नी सौ किरण धनंजय वळेकर यांना एलआयसी (LIC) चा MDRT 2024 (मिलियन डाॅलर राऊंड टेबल) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
एलआयसी (LIC) चा MDRT 2024 (मिलियन डाॅलर राऊंड टेबल) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सौ वळेकर यांना सलग चौथ्यांदा मिळालेला आहे.
यावेळी बार्शी शाखेचे शाखाधिकारी किशोर वानखेडे, टेंभूर्णीचे शाखाधिकारी श्री खंदारे, करमाळ्याचे शाखाधिकारी श्री शिरुरकर यांनी अभिनंदन केले आहे.
जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहचून एलआयसी (LIC) च्या योजनेचा लाभ कसा घेता येईल यावर आमचा सतत भर असतो, एलआयसीच्या माध्यमातून ग्राहकांना फायदा होईल याची आम्ही काळजी घेतो, पुढील काळातही जास्तीतजास्त कुटुंबीयांपर्यंत पोहचून एलआयसीचा लाभ मिळवून देणार आहे.
सौ किरण धनंजय वळेकर, विमा सल्लागार, जेऊर
- नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक
- ३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव
- इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे
- कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन


