श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने आज करमाळ्यात दिपोत्सव 2023 चे आयोजन
करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने करमाळा शहरातील किल्ला येथील हनुमान मंदिर येथे भव्य दिपोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.
हा दिपोत्सव आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला सायंकाळी 7 वाजल्यापासून प्रारंभ होईल. तरी करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्रीरामनवमी उत्सव समिती वतीने करण्यात आले आहे.