October 9, 2026

केत्तूरच्या श्री किर्तेश्वर देवस्थान नियोजन समितीच्या अध्यक्षपदी अतुल राऊत

0
IMG_20240227_082547.jpg

केत्तूर, दि. २७ (करमाळा-LIVE)-
केत्तूर येथील पुरातन श्री किर्तेश्वर देवस्थान च्या श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट केत्तूर संचलित श्री किर्तेश्वर देवस्थान नियोजन समितीच्या अध्यक्ष पदी अतुल नवनाथ राऊत यांची नियुक्ती करण्यात आली.

देवस्थान च्या विश्वस्तांनी राऊत यांना पत्र देऊन ही नियुक्ती केली आहे. केत्तूर येथील श्री किर्तेश्वर हे देवस्थान पुरातन हेमाडपंथी असून या देवस्थान चा काशीखंड, शिवलाल अमृत, योगवासिष्ठ या पुरातन ग्रंथात उल्लेख आढळतो. या ठिकाणी सन १९९६ साली तेरा कोटी नामजप यज्ञ करण्यात आला होता. या यज्ञास करवीर पिठाचे तत्कालीन शंकराचार्य विद्याशंकर भारती हे उपस्थित होते.

दि. ११ सप्टेंबरला भव्य कळशारोहन समारंभ संपन्न झाला होता. दर सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असुन. श्री किर्तेश्वर देवस्थान तर्फे २ मार्च ते ९ मार्च अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री किर्तेश्वर देवस्थान हे हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असुन दर्शनासाठी नेहमी गर्दी होत असते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page