करमाळ्यातील संकेत साठे याची सेल टॕक्स इन्स्पेक्टर पदी निवड
करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-
करमाळा येथील संकेत सुजित साठे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे सेल टॅक्स इन्स्पेक्टर पदी (कर निरीक्षक) पदी निवड झाली आहे.
संकेत हा मेकॅनिकल इंजिनियर असून महावितरणचे प्रधान यंत्रचालक सुजित प्रभाकर साठे यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून यापुढे देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून वरिष्ठ पद मिळविण्याचा त्याचा मानस आहे.