वाशिंबे येथे बैलपोळा सण उत्सहात साजरा

वाशिंबे, दि. 15 (सचिन भोईटे)-
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालक, उजनी बॅक वॉटर पट्टातील प्रगतशील शेतकरी नवनाथ झोळ यांच्या दत्तकला फार्महाऊस वाशिंबे येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा केला.
शेतकऱ्यांसोबत वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा, करमाळ्याच्या पश्चिम भागात भाद्रपद अमावस्येला भादवी पोळा साजरा जातो. बैलांना सजवून आणले जाते. आज झोळ परिवार यांनी पुरण-पोळीचा गोड नैवद्य खाऊ घालत पूजा करुन बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण साजरा केला.
- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला


