07/06/2025

विधानसभा प्रमाणेच आदिनाथची दुरंगी लढत ; पाटील-शिंदे यांच्यात थेट लढत – पाटील गटाचे पारडे जड तर विरोधक अजूनही बॕकफुटवर

0
IMG-20230319-WA0014-1.jpg

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-
गत विधानसभा निवडणुकी प्रमाणेच आदिनाथची निवडणूक तिरंगी मोडवरून दुरंगी होत असून पाटील-शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे तर एकंदरीत पाहिले गेले तर सध्यातरी पाटील गटाचे पारडे जड असून विरोधक अजूनही बॕकफुटवर पहायला मिळत आहेत.

विधानसभेला पाटील-बागल-शिंदे यांच्यात तिरंगी लढत होती परंतु ऐनवेळी ही निवडणूक दुरंगी मोडवर अर्थातच पाटील-शिंदे यांच्यात झाली त्याप्रमाणे आदिनाथचीही निवडणूक दुरंगी मोडवर आलेली आहे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या अखेरच्या टप्प्यात आलेली असून तालुक्यातील जगताप आणि बागल गटांनी अगोदरच माघार घेतलेली असून आमदार नारायण आबा पाटील आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यात थेट दुरंगी लढत होत आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून सध्यातरी पाटील गटाचे पारडे जड असून विधानसभा प्रमाणे आदिनाथ निवडणुकीतही पाटील गट विजयी होणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page