बदल हवा तर चेहरा नवा! सावंत गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला ; मोहिनीताई सावंत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)-
बहुचर्चीत करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आणि गटांनी कंबर कसली असून करमाळा तालुक्यात नेहमीच किंगमेकर च्या भुमिकेत राहिलेल्या सावंत गट यावेळी नगराध्यक्ष पदाची निवडणूक पूर्ण ताकीदीने लढणार आहे.
करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला राखीव असून नगराध्यक्ष पदासाठी तालुक्यातील सावंत गटाकडून मोहिनीताई संजय सावंत यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे. त्यानुसार सावंत गट तयारी करीत असून ‘ बदल हवा तर चेहरा नवा, आत्ता वेळ बदलणार, जनतेचा विश्वास, सामान्यांची आशा, एकच ध्यास सर्वसामान्यांचा सर्वांगीन विकास असे स्लोगन घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.





