उमरडच्या नेहा चौधरीची धर्मदाय निरीक्षक पदी निवड

जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)-
उमरड येथील नेहा मोहन चौधरी हिची धर्मदाय निरीक्षक पदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत परीक्षा घेऊन ही निवड करण्यात आली आहे. नेहा चौधरी ही एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी असून ती कृषी पदवीधर आहे. तिचे कृषी पदवीचे शिक्षण दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात पूर्ण झाले आहे.
लहानपणापासून हुशार व जिद्दी असणाऱ्या नेहाचे धार्मिक ग्रंथांचे वाचन उल्लेखनीय आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तर माध्यमिक शिक्षण भारत हायस्कूल जेऊर येथे झाले आहे.
तिच्या यशाबद्दल हभप चिंतामणी महाराज घोडके, रामेश्वर महाराज शिंदे, विठ्ठल महाराज पाटील, संजय महाराज बाबर, यांच्यासह उमरड व परिसरामध्ये विशेष कौतुक होत आहे.



