27/03/2026

सेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या महेश इंगळे यांना ‘यशकल्याणी जीवन गौरव पुरस्कार’

0
IMG-20260327-WA0050.jpg

अक्कलकोट, दि. २७ (करमाळा-LIVE)-
समाजसेवा, शिक्षण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधत हजारो स्वामी भक्तांच्या जीवनात आशेचा दीप प्रज्वलित करणारे श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन मा. श्री. महेश (मालक) इंगळे यांना यशकल्याणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान म्हणजे केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नसून, निस्वार्थ सेवाभाव, दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेल्या अढळ निष्ठेचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

अक्कलकोट येथे आयोजित जिल्हास्तरीय टीचर एम्पॉवरमेंट प्रोग्राम व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात हा प्रेरणादायी सन्मान प्रदान करण्यात आला. इंग्रजी असोसिएशनचे विश्वस्त सल्लागार तथा यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “समाजहिताच्या विविध उपक्रमांतून, शैक्षणिक संस्थांचे यशस्वी नेतृत्व करताना आणि स्वामी भक्तांसाठी देवस्थानाच्या माध्यमातून सातत्याने सेवा पुरवताना महेश इंगळे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.”

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त मा. संपतराव (भारतराव) शिंदे पाटील होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. गणेश करे पाटील, प्रोलक्स वेलनेस प्रा. लि.च्या संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे, ग्लोबल अकॅडमिक प्रा. डॉ. झेड. एन. पाटील, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रा. बाळकृष्ण लावंड, सुनीता देवी, गुरुनाथ मुचंडे, अश्पाक काझी, सचिव धनाजी राऊत, उपाध्यक्ष आबासाहेब दाढे, शशिकांत चंदनशिवे, अगतराव भोसले, प्रसिद्धीप्रमुख सुखदेव गिलबिले, बापू गायकवाड, तसेच करमाळा तालुका इंग्रजी असोसिएशनचे अध्यक्ष कल्याणराव साळुंके, सचिव गोपाळ पाटील व सहसचिव मारुती जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पुरस्कार स्वीकारताना मा. महेश (मालक) इंगळे भावुक होत म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्यानेच हे कार्य शक्य झाले. समाजसेवा हीच खरी पूजा मानून, येणाऱ्या काळातही अधिक समर्पणाने आणि निष्ठेने कार्य करत राहण्याचा माझा निर्धार आहे.”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page