जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक

जेऊर, दि. ३० (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या हिरकणी स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांनी पहिला क्रमांक आलेला असून त्यांना स्मार्ट एलइडी टीव्ही बक्षीस म्हणून मिळालेला आहे.
जेऊर येथील ॲड. सविता शिंदे, विजया कर्णवर, उज्वला मेहता, माया कदम, कोमल गोरे, आरती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.
यावेळी द्वितीय क्रमांक दिपाली वाघमोडे, तिसरा क्रमांक मनिषा लोंढे यांचा तर उत्तेजनार्थ क्रमांक विशाखा मेहता यांचा आला आहे.
यावेळी माया झोळ,डॉ. विद्या दुरंदे, विद्या बारकुंड, डॉ. भारती हजारे, एलिझाबेथ असादे, रेश्मा भोगे, ॲड संगिता यादव, जयश्री सलगर, वर्षा सोनवणे, पूनम शिंदे, विद्या सरडे, अॕड लता गावडे आदी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उज्वला मेहता होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून पंचायत समिती करमाळा तालुका अभियान व्यवस्थावक सुषमा बिचुकले होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड सविता शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन विजया कर्णवर यांनी तर आभार आरती शिंदे यांनी मानले.
कार्यक्रमात विविध स्पर्धांचे संचालन ॲड कोमल गोरे, समिना शेख, सुजाता जाधव यांनी केले. स्पर्धांचे परिक्षक म्हणून विजयमाला चवरे, गीता कापडी, वीणा देवी, ॲड संगिता यादव यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वाती सपकाळ, अॕड. दीपाली पन्हाळकर, ॲड भाग्यश्री वाशिंबेकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमासाठी सचिन निमगिरे यांनी अल्पोपहाराची सोय केली तर सर्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या व पारितोषिक मिळवलेल्या स्पर्धकांना . ॲड सविता शिंदे, विजया कर्णवर, उज्वला मेहता, कोमल गोरे यांच्यातर्फे टि.व्ही, डिनर सेट, मूर्ती, किचनवेअर आदी वस्तू भेट देण्यात आल्या.





