प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
सावडी गावचे सुपुत्र आणि सध्या गंगावळण (ता.इंदापूर) येथील रहिवासी असणारे वैभव उद्धव ठोंबरे-पाटील याची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड झालेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये, वैभवची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झालेली आहे. वैभव याची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी मोलमजुरी करण्यासाठी स्वतःचे गाव सोडून दुसऱ्या गावी स्थलांतर केलेले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, स्वतः घरीच अभ्यास करून यश संपादन केलेले आहे. एम.ए. शिक्षण एस.पी. कॉलेज पुणे या ठिकाणी पूर्ण केले आहे.
त्याच्याबद्दल यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून कविटगावं चे सरपंच शिवाजी सरडे, ॲड. प्रदीप सरडे तसेच सखल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने वैभवचा सत्कार करण्यात आला.
