जेऊर येथील स्वयंभू श्री महादेव मंदिर ; श्रावणात गेल्या अठरा वर्षांपासून “ओम नमः शिवाय’ चा अखंड जप आजही सुरू


जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे स्वयंभू महादेव मंदीर असून गेल्या अठरा वर्षांंपासून श्रावण महिन्यात श्रावणमास निमित्त अखंड “ओम नम: शिवाय” सुरू असून भाविक आवर्जून दर्शनासाठी येत असतात.
स्व.स्वामी आनंदयोगी महाराज, स्व.संत निराळे बाबा तसेच स्व.कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्या कृपाशीर्वादाने तसेच आमदार तथा आदिनाथ सहकारी साखर कारखाना चेअरमन नारायण आबा पाटील यांचच्या संकल्पनेतून हा जप गेल्या अठरा वर्षांपासून सुरू आहे.
आषाढ अमावास्या संपताच श्रावण मासच्या अगदी पहिल्या दिवसापासून जपास सुरूवात होते. व श्रावण अमावास्या संपता क्षणी जपाची महादेवाच्या काठीची सवाद्य मिरवणूक काढून सांगता होते
पहाटे ०६.०० पासून सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत महिला भक्तांचा सहभाग असतो आणि सायंकाळी ०४.०० नंतर पुरुष भक्त सहभागी होतात आणि रात्री तर १० ते १२ जण महिनाभर महादेव मंदिरात दरवर्षी मुक्कामी असतात.
महिन्यातील प्रत्येक सोमवारी आमदार नारायण आबा पाटील यांच्यावतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शाबुदाणा खिचडीच्या प्रसादाचे वाटप केले जाते आणि नंतर शेवटी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचे नियोजन केले जाते.
संकलन-
श्री प्रेमनाथ कुलकर्णी, जेऊर,
मोबाईल- 94032 94133




