October 18, 2026

शेटफळ येथे शेतजमिनीच्या वादातून दिव्यांग महिलेला मारहाण आणि विनयभंग; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
IMG-20261018-WA0015.jpg

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) येथे शेतजमिनीच्या कारणावरून एका ३७ वर्षीय दिव्यांग महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली असून, तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक १७ रोजी दुपारच्या सुमारास घडली. फिर्यादी महिला ही ६० टक्के दिव्यांग असून, ती आपल्या पतीसह शेती करून उदरनिर्वाह करते. शेटफळ शिवारातील गट नं. २१ मधील त्यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू असताना ही घटना घडली.

फिर्यादी महिला शेतात असताना, त्यांच्याच गावातील ओळखीचे पाच संशयित आरोपी – १) तुकाराम नामदेव मासाळ, २) धोंडीराम नामदेव मासाळ, ३) राजेश पोपट नरुटे, ४) दादा विठ्ठल गुटाळ, आणि ५) गणेश गोरख डिगे – तिथे आले.

फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार, हे पाचही जण शेताजवळच्या रस्त्यावर आले. त्यांनी ‘हे शेत आमचे आहे, तुम्ही उसाचे पीक का तोडता?’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी एका आरोपीने, फिर्यादी महिला दिव्यांग असल्याची माहिती असतानाही, तिला लाथ मारून खाली पाडले.

त्यानंतर एका आरोपीने फिर्यादीच्या अंगावर बसून तिची छाती दाबली, ब्लाउज फाडला आणि तिला अश्लील वर्तन करून विनयभंग केला. तिला उसात ओढत नेण्याचाही प्रयत्न झाला. यावेळी पीडितेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रही तुटून कुठे तरी पडले.

यावेळी पतीलाही गंभीर मारहाण आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या पतीलाही आरोपींनी सोडले नाही. त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि हाताबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच एका आरोपीने त्यांच्या पाठीवर लोखंडी कुऱ्हाडीच्या दांड्याने वार करून त्यांना जखमी केले. दुसऱ्या एका आरोपीने लाकडी काठीने मारहाण केली. आरोपींनी पती-पत्नी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर पीडित दांपत्य करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी करमाळा येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे जाण्यास सांगण्यात आले.

पीडित दिव्यांग महिलेच्या जबाबानुसार, करमाळा पोलीस ठाण्यात पाचही संशयित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली (गुन्हा र.नं. १५१०१०/१०४०/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत मधुकर गोरे करत आहेत. हा गुन्हा पोलीस निरीक्षक रणजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, दिव्यांग महिलेवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केला जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page