October 25, 2026

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळ्याचे नरेंद्रसिंग ठाकूर यांची निवड

0
IMG-20261025-WA0011.jpg

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळ्याचे नरेंद्रसिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंकजसिंग ठाकूर यांनी या निवडीची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष हरिवंशसिंग यांच्या सूचनेनुसार राज्यातील विविध पदांची निवड प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेची स्थापना १८९७ मध्ये झाली असून, देशभरात तिचे कार्य सुरू आहे. क्षत्रिय समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी ही संघटना कार्य करत आहे.

नरेंद्रसिंग ठाकूर यांचे सामाजिक कार्य विचारात घेऊन वरिष्ठांनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी युवा राजपुताना संघटनेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या ठाकूर यांनी संजय गांधी निराधार योजना आणि विधी सेवा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

याशिवाय, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस आणि किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अयोध्येतील सैनिक हुतात्मा स्मारक ट्रस्टचे सहसचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, ते डिजिटल मीडियाचे तालुका सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.

सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या ठाकूर यांनी विविध आंदोलनांत भाग घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. क्षत्रिय समाजाच्या विकासासोबतच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे, शिक्षण, संस्कृती आणि रोजगाराला प्राधान्य देणे हा आपला उद्देश असल्याचे नरेंद्रसिंग ठाकूर यांनी सांगितले.

त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे. लवकरच सोलापूर जिल्ह्यात दौरा करून संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page