वांगी : पुंजहिरा वस्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुजाता देशमुख तर उपाध्यक्षपदी अश्विनी पाटील
वांगी, दि. 17 (करमाळा-LIVE)-
वांगी येथील पुंजहिरा वस्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुजाता देशमुख तर उपाध्यक्षपदी अश्विनी पाटील यांची निवड झाली आहे.
तसेच सदस्य पदी रुपाली गोसावी, वर्षा कळसाईत, शुभांगी देशमुख, बालाजी भुई, राहुल शिंदे, बिभिषण मिसाळ, रविंद्र शिंदे, बाळासाहेब पाटील, सुदाम जाडकर, विद्यार्थी प्रतिनिधी पदी आनंदी गोसावी, रेणुका संजय भुई, दिनकर उघडे निवडी करण्यात आल्या.
यावेळी व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सचिन देशमुख यांचा सत्कार कानिपनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माजी उपाध्यक्ष अतुल पाटील यांचा सत्कार सतिश पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. बाळकृष्ण लावंड सन्मानित
- वन्यजीवांसाठी ‘जलदूत’ बनले सातव बंधू ; सौरभआणि माऊली यांच्याकडून वनक्षेत्रालगतच्या पाणवठ्यात नियमित पाणीपुरवठा
- जेऊरवाडी येथील योगेश निमगिरे यांचे आकस्मिक निधन ; जेऊर परिसरात शोककळा



