मराठा आरक्षणासाठी पार्डीत महिलांचा कँडल मार्च
करमाळा, दि. 30 (करमाळा-LIVE)-
मराठा आरक्षण मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पार्डी येथे महिलांनी कँडल मार्च काढला.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलनाचे लोण पसरले असून कुठे गाड्यांची जाळपोळ, कुठे बसेसची तोडफोफ तर कुठे राजकीय नेत्यांच्या कार्यालयांना लक्ष्य केले जात आहे. तर काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने देखील आंदोलन सुरु आहे. तर पार्डी येथे गावातील महिलांनी आज कँडल मार्च काढला, मराठा आरक्षण लवकरात लवकर जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मराठा आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी केली आहे. यावेळी मीना चौघुले, संगीता मोरे, मनिषा मोरे, मंगल मोरे, शंकुतला मोरे, उमा जाधव, चतुरा मोरे, रामुबाई कराळे, कल्पना चौघुले, गायत्री मोरे, राणी दुरगुळे, काजल मोरे, राजकन्या कुकडे, पुनम कराळे, निकीता चौघुले, ज्योती जाधव आदी महिला कँडल मार्च मध्ये सहभागी झाल्या होत्या तर यावेळी दिनेश चौघुले, शुभम जाधव, शशिकांत वाघमारे, संजीवन मोरे, वामन मोरे, सुधाकर मोरे, रामदास मोरे, चैतन्य चौघुले उपस्थित होते.


- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला
