ठरलं तर मग! 50 वर्षांनी पुन्हा एकत्र यायचं ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 1974-1975 बॕचने केले गेट टू गेदर चे आयोजन



जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-
ठरलं तर मग! 50 वर्षांनी पुन्हा एकत्र यायचं, जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 1974-1975 बॕचने केले गेट टू गेदर चे आयोजन केले आहे.
भारत हायस्कूल मध्ये जे 1974-1975 या शैक्षणिक वर्षात जे नववी, दहावी आणि जुनी अकरावी या वर्गात ज्यांनी शिक्षण घेतले त्यांचा स्नेह मेळावा म्हणजेच गेट टू गेदर पुढील महिन्यात जानेवारी 2024 ला होणार आहे.
या शैक्षणिक वर्षात वरील इयत्तेत शिक्षण घेतलेला सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी स्नेह मेळाव्यात सहभागी होऊन जुन्या पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच एकमेकांचे सुख, दुख मध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन माजी विद्यार्थी अब्दुल गणी शेख व विलास जेऊरकर यांनी केले आहे.
गेट टू गेदर मध्ये सहभागी होण्यासाठी पुढीलप्रमाणे नंबरवर संपर्क करावा-
1) अब्दुल गणी शेख- मोबाईल-9890570115
2) विलास जेऊरकर- मोबाईल- 9823051012
वरीलप्रमाणे नंबरवर संपर्क करावा अथवा आपले नाव, गावं इत्यादी माहिती पाठवावी.


- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर