सांघिक सूर्य नमस्कार स्पर्धेत विवेकानंद पब्लिक स्कूलचे यश

सोलापूर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
बार्शी रोडवरील खेड येथील विवेकानंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांघिक सूर्य नमस्कार स्पर्धेत यश मिळविले आहे.
सोलापूर जिल्हा योग परिषद, इनर व्हील क्लब आणि योग साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नूतम मराठी विद्यालयातआयेजित करण्यात आलेल्या सांघिक सूर्य नमस्कार स्पर्धेत
विवेकानंद पब्लिक स्कूलने नेत्रदीपक कामगिरी करत सूर्यनमस्कार प्रकारातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मुले व मुली यांनी नाविन्यपूर्ण सूर्यनमस्कार सादर करत दोन्ही संघांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत मुलींच्या गटातून पुढीलप्रमाणे मुली सहभागी झाल्या होत्या- अनिका काबरा, धून सारडा, धीरा कांबळे, जागृती मोरे, सिद्धी ननवरे, संचाली तळेकर, त्रिशा शिंदे, विधी धूत, स्वरा झेंडगे, जानवी पाटील, अशिता भुतडा, श्रेया जाधव.
तर मुलांच्या गटातून सक्षम झवेरी, अथर्व कोळेकर, आयुष खरे, कुणाल पाटील, सुजय लिगाडे, अलोक यादव, आयुष नागणे, मल्हार गुरव, पृथ्वीराज पवार, सोहम तळेकर, श्लोक चोबे, रिषभ शिंदे आदी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक विठ्ठल वाघचवरे यांचे मार्गदर्शन मिळाले. तर यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या संचालिका संगीता सारडा, मुख्याध्यापिका आयेशा इनामदार, पर्यवेक्षिका मनाली शहा यांनी अभिनंदन केले आहे.






