08/06/2025

अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केल्या प्रकरणी एकास जामीन मंजूर

0
IMG-20221210-WA0012-2-2-1-1.jpg

सदर प्रकरणी आरोपी तर्फे अॕड निखिल पाटील, अॕड दत्तप्रसाद मंजरतकर, अॕड सतपाल नरखेडे यांनी काम पाहिले.

करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)-अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केल्या प्रकरणी एकास जामीन मंजूर झाला आहे.

या बाबत हकीकत अशी की, पांढरी (ता.बार्शी) येथील रणजीत हनुमंत घावटे (वय 28) याने एका 17 वर्षीय मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिला धमकी देऊन पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पांगरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

सदर प्रकरणी त्याचे विरुद्ध भा.द.वी.कलम 363 376 2n 506 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 4 8 12 प्रमाणे आरोप ठेवण्यात आलेले होते. सदरच्या आरोपीस दिनांक 19 /02/ 2024 रोजी अटक करण्यात आली होती तदनंतर यातील आरोपीने जामीन मिळणे कामी अॕड निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली होती सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे सी जगदाळे यांचे समोर झाली सदर जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील यांनी यातील आरोपी व अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध होते व तशा प्रकारचे पुरावे मा कोर्टासमोर सादर केले तसेच सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून आरोपीस तुरुंगात ठेवण्यासाठी कुठलेही सबळ कारण नसल्याचा युक्तिवाद केला.

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी रणजीत हनुमंत घावटे याची अटी व शर्तीवर जामीनावर मुक्तता करण्यात आली.

सदर प्रकरणी आरोपी तर्फे अॕड निखिल पाटील, अॕड दत्तप्रसाद मंजरतकर, अॕड सतपाल नरखेडे यांनी काम पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page