06/06/2025

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी पत्रकार विशाल परदेशी

0
image_editor_output_image-1724664187-1736478649122.jpg

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी शहरातील विशाल सुरेशसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मंगळवार दि. ७ रोजी विशाल परदेशी यांना निवडीचे पत्र दिले आहे. भारतीय संविधान, भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच या पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करणार आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करणार असल्याचे विशाल परदेशी यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले आहे.

या निवडीनंतर विशाल परदेशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page