येत्या गुरूवारी जेऊरच्या भारत शैक्षणिक संकूलाचे ६५ वे वार्षिक स्नेहसंमेलन ; डॉ वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकूलाच्या वतीने ६५ वे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवारी दि. ९ जानेवारी रोजी दुपारी २.०० वाजता स्नेहसंमेलन होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
स्नेहसंमेलनाला प्रमुख प्रवक्ते म्हणून सुप्रसिध्द व्याख्याते डॉ वसंत हंकारे उपस्थितीत राहणार असून स्नेहसंमेलन अध्यक्ष म्हणून करमाळा येथील उस्मानशेठ तांबोळी (उपाध्यक्ष, काँग्रेस, पुणे) उपस्थित राहणार आहेत.
गुरूवारी ९ जानेवारीला दुपारी २.०० वाजता माजी विद्यार्थी मेळावा तसेच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. शुक्रवारी १० जानेवारीला दुपारी २.०० वाजता कलापथकाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी ११ जानेवारीला भाग-२ चे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
६५ व्या स्नेहसंमेलनची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार नारायण पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, पर्यवेक्षक प्रा. अर्जून सरक, प्राचार्य आबासाहेब सरोदे, उपप्राचार्य एन.डी. कांबळे, पर्यवेक्षक बी.एस शिंदे, प्राचार्य अनंत शिंगाडे, स्नेहसंमेलन चिटणीस सुनिल तोरमल यांनी दिली आहे.






- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला
