10/06/2026

सोलापूर : जेऊरच्या भारत हायस्कूलचे भिमराव सरक यांना ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्कार प्रदान

0
IMG-20250309-WA0020.jpg

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत हायस्कूलचे क्रीडा शिक्षक भिमराव सरक यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक-सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श क्रीडा पुरस्कार सरक सर यांना नुकताच जाहीर झाला होता.

सोलापूर येथील हुतात्मा स्मृती भवन येथे विधानपरिषदेचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चेअरमन माळी सर, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी भारत संस्थेचे शिक्षक उपस्थित होते.

याबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार गादीया, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, सचिव प्रा.अर्जून सरक, प्राचार्य आबासाहेब सरवदे, उपप्राचार्य एन.डी कांबळे, पर्यवेक्षक बी.एस शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page