10/06/2026

राजुरी व हिसरे येथे आमदार संजयमामा शिंदे गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्त्यांचा रश्मी बागल यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश

0
IMG-20241104-WA0018.jpg

करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील राजुरी आणि हिसारे येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाला धक्का बसला असून भाजप प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या गाव भेट दरम्यान राजुरी येथील पिनू साखरे,भाऊ सराटे, संतोष मोहीते, मारुती साखरे, बापूसाहेब साखरे, आजिनाथ शिंदे, नाना साखरे, लक्ष्मण शिंदे, योगेश लांडगे, दादासाहेब जाधव, राहूल पाटील, सोनू साखरे तर हिसरे येथील अशोक जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला राम राम करत महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.मागील अनेक दिवसांपासून करमाळा तालुक्यातआ.संजयमामा शिंदे गटाला गळतीचे सत्र सुरू असून पुढील आठवड्यात शिंदे व पाटील गटातून महायुतीला साथ देणाऱ्यांचे मोठे प्रवेश होणार असल्याची माहिती बागल यांच्या कडून देण्यात आली आहे.यावेळी राजुरी येथील प्रवेश केलेल्या सर्वांनी सांगितले की भाजप प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांना राजुरी गावांमधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यावेळी मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ, अजित झांजुर्णे, काशीनाथ काकडे, गणेश झोळ, राजेंद्र मोहोळकर, साधनाताई खरात, सतीश झोळ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page