October 9, 2026

जेऊरच्या भारत हायस्कूलचा सुमित सरक मल्लखांब स्पर्धेत पुणे विभागात प्रथम; सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

0
IMG-20230109-WA0044.jpg

जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
जेऊरच्या भारत हायस्कूलचा सुमित सरक मल्लखांब स्पर्धेत पुणे विभागात प्रथम आला असून सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.

करमाळा तालुक्यातील कंदर येथे पुणे विभागीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक नवनाथ भांगे, संचालक विलास माने, क्रीडा अधिकारी मोरे साहेब, राज्य मल्लखांब संघटनेचे सहसचिव पांडुरंग वाघमारे, राज्य मल्लखांब संघटनेचे टेक्निकल कमिटीचे चेअरमन मोहन झुंजे-पाटील, सचिव प्रा सुनील भांगे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी पुणे विभागातून 120 मुले आणि 120 मुली अशी एकूण जवळपास 240 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी पंच म्हणून बाळासाहेब शिंदे, हनुमंत खंडजोडे, हनुमंत कदम, धनाजी पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सचिव प्रा सुनील भांगे, प्रशालेचे मुख्यध्यापक बी एस पवार तसेच क्रीडा शिक्षक सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ग्रामीण भागात पाहिल्यानंदा अशा मोठ्या स्पर्धा होत असल्याने विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सुमित सरक याच्या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण पाटील, उपाध्यक्ष अनिल गादिया, सचिव प्रा. अर्जून सरक, प्राचार्य केशव दहिभाते, पर्यवेक्षक एन.डी कांबळे, क्रीडा शिक्षक पांडुरंग वाघमारे आणि बाळासाहेब शिंदे यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page