10/06/2026

How’s the Josh: जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रशासनाला 21 दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा रेल रोको- हजारोंच्या संख्येने रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन

0
IMG-20230221-WA0079.jpg

जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE)-
आज मंगळवारी 21 तारखेला जेऊर येथील स्टेशन मास्तर यांना हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा मिळविण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले यावेळी सर्व पक्षीय तसेच विविध संघटनाकडून रेल्वे प्रवासनाला निवदेन देण्यात आले. हुतात्मा एक्सप्रेसला येत्या 21 दिवसांत थांबा मिळाला नाही तर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान जेऊर परिसरातील नागरिकांनी या मोर्चाला प्रचंड मोठा पाठिंबा दिला विविध संघटनाकडून निवेदने सादर करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या हुतात्मा एक्सप्रेस थांब्यासाठी रेल्वे प्रशासन उदासीन आहे. रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. जेऊरकरांचा अंत पाहत असून आता माघार नाही असा निर्धार काल जेऊर येथे बैठकीत करण्यात आला होता. दरम्यान आज जेऊर ग्रामपंचायत पासून रेल्वे स्टेशन पर्यंत शांततेत मोर्चा काढण्यात आला. जेऊर मधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या मोर्चात सहभागी झाले होते. करमाळा तालुक्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

https://fb.watch/iQsKfDVDNZ/

https://fb.watch/iQsM1vP1Q9/

https://fb.watch/iQsMGj21Zf/

https://fb.watch/iQsNO8oG7n/

https://fb.watch/iQsOUI9uFI/

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page