05/06/2026

करमाळ्यात भारतीय जनता पार्टी आणि नंदन प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
IMG-20260605-WA0034.jpg

करमाळा, दि. ५ (करमाळा-Live)-

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप सरचिटणीस तथा नंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेश कटारिया यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम 2026 श्री संत संताजीनगर करमाळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पर्यावरण संवर्धन व हरित भविष्यासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास भाजपा पदाधिकारी , प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते संजय घोरपडे , तालुकाध्यक्ष काका सरडे, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी,
शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, नगरसेवक युवराज चिवटे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश क्षिरसागर,अमोल पवार,आजिनाथ सुरवसे, नितीन झिंझाडे, पत्रकार दिनेश मडके,सचिन पांढरे, हनुमंत मस्तूद, नितीन व्हटकर गुरुजी,निलेश माने,अक्षय जाधव, महेश क्षिरसागर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page