October 12, 2026

जेऊर : अरिज शेख या सात वर्षीय मुलाचा पहिला रोजा पूर्ण

0
IMG-20240326-WA0063.jpg

जेऊर, दि. २७ (गौरव मोरे)-
जेऊर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे समीर शेख यांचा पहिली मध्ये शिकणारा मुलगा अरिज (वय ७) याने पहिला रोजा पूर्ण केला आहे

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून, आज पंधरा रोजे (उपवास) पूर्ण झाले आहेत. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळपास १४ ते १५ तास राहण्याची शक्तीच जणू देव या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते. त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो.जेऊर येथील अरिजने रोजा ठेवला आणि संपूर्ण १४ तास निर्जली राहिला, त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.

अरिज हा जेऊर येथील लिटल एंजल्स स्कूल मध्ये शिकत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page