October 9, 2026

मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची लव्हे येथे शिवजयंती निमित्त भेट

0
IMG-20240304-WA0030.jpg

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
सकल मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी म्हणून आरक्षण मिळावे व सगे सोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज दादा जरांगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी करमाळा तालुक्यातील लव्हे येते शिवजयंती निमित्त भेट दिली.

यावेळी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, आचारसंहिता लागण्या अगोदरच आरक्षण देण्यासाठी सरकारला भाग पाडू त्यासाठी सर्व समाज बांधवांनी आरक्षण लढ्यात सहभागी व्हावे. ओबीसीतील सर्वसामान्य बांधव सुद्धा आपल्यासोबत आहेत आरक्षण हेच आपलं अंतिम ध्येय आहे आरक्षण मिळवण्यासाठी मला मरण आलं तरी सुद्धा मी मागे हटणार नाही.

अशी निर्णायक भूमिका मांडली यावेळी गावातील व तालुक्यातील शिवप्रेमी समाजबांधव महिला भगिनी आदिची लक्षनिय् उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page