August 12, 2026

इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे

0
IMG-20260812-WA0040.jpg

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-

इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रभावी वक्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या बळावर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतात. इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला जागतिक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास प्रोलक्स वेलनेस अँड ग्लॅमोवेलच्या संचालिका डॉ. प्रचिती पुंडे यांनी व्यक्त केला.

यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा २०२६ करमाळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या वक्तृत्व कौशल्याचे प्रभावी दर्शन घडविले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त मा. भारतभाऊ शिंदे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रोलक्स वेलनेस अँड ग्लॅमोवेलच्या संचालिका डॉ. प्रचिती पुंडे उपस्थित होत्या. शहीद मेजर अमोल निलंगे यांचे वीर पिता मा. अरविंद काका निलंगे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. गणेश करे-पाटील,डॉ. कविता कांबळे, प्रा.गुरुनाथ मुचंडे, इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लावंड , गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूरचे अधिव्याख्याता.श्री सुभाष बुवा ,श्री रामदास टोणे, धनाजी राऊत, शशिकांत चंदनशिवे, अगतराव भोसले, आबासाहेब दाढे, समन्वयक रेवणनाथ आदलिंग परीक्षक परशुराम दळवी, सुनील गोरखे, गणेश बनकर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक,, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रचिती पुंडे म्हणाल्या, “ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, कल्पकता आणि प्रतिभेची कमतरता नाही. त्यांना योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास मिळाला तर ते कोणत्याही जागतिक व्यासपीठावर समर्थपणे उभे राहू शकतात. इंग्रजी ही केवळ संवादाची भाषा नसून ज्ञान, संधी आणि जगाशी जोडणारे प्रभावी माध्यम आहे. अशा वक्तृत्व स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा मिळते.”

सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनच्या विविध उपक्रमांची आणि इंग्रजी भाषा संवर्धनासाठी सुरू असलेल्या कार्याची दखल घेत असोसिएशनच्या कार्यासाठी सदैव तत्पर असल्याची आणि भरीव आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर सभागृहात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
पारितोषिक वितरणाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इंग्रजी विषयात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविणाऱ्या करमाळ्याच्या कु. तेजस्विनी मंडलिक हिच्या सन्मानाने झाली. तिला यशकल्याणी संस्थेच्या वतीने पाच हजार रुपये रोख मानपत्र, स्मृतिचिन्ह, मायेची शाल आणि ग्रंथ प्रदान करण्यात आला.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी
इयत्ता ५वी ते ६वी गट
प्रथम : अनुजा श्रीमंत सावळी — एच. डी. प्रचंड हायस्कूल, नागणसूर, ता. अक्कलकोट
द्वितीय : अन्वी संजय गर्जे — जि. प. शाळा, करंजे, ता. करमाळा
तृतीय : गाथा ज्ञानेश्वर मिळे — हनुमान हायस्कूल, तांदुळवाडी, ता. माळशिरस
उत्तेजनार्थ : स्वरा दीपक कोकरे — नवनीत प्राथमिक विद्यालय, पंढरपूर
उत्तेजनार्थ : प्रसाद प्रवीण भोजने — नूतन हायस्कूल, बोराळे, ता. मंगळवेढा

इयत्ता ७वी ते ८वी गट

प्रथम : वेदिका सचिन देशमुख — गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस
द्वितीय : मुजामिल शफिक शेख — सुरवसे हायस्कूल, सोलापूर
तृतीय : दिव्या पवन सावंत — विद्यामंदिर प्रशाला, सांगोला
उत्तेजनार्थ : तेजस सचिन कारंडे — विद्या मंदिर हायस्कूल, वैराग, ता. बार्शी
उत्तेजनार्थ : आरोही सोमनाथ हिप्परगी — नूतन विद्यालय, मंगरूळ, ता. अक्कलकोट

इयत्ता ९वी ते १०वी गट

प्रथम : अक्षरा दादासाहेब घाडगे — लालबहादूर शास्त्री विद्या, सालसे, ता. करमाळा
द्वितीय : भाग्यश्री बाळासाहेब सोनवणे — महाराष्ट्र विद्यालय, बार्शी
तृतीय : श्रावणी सुनील हवीनाळे — यशवंत विद्यालय, औराद, ता. दक्षिण सोलापूर
उत्तेजनार्थ : नुपूल चंद्रकांत पवार — हनुमान विद्यामंदिर, मरवडे, ता. मंगळवेढा
उत्तेजनार्थ : अलिशा बंदेनवाज दफेदार — नूतन विद्या, मंगरूळ, ता. अक्कलकोट

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसह सहभागी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे यशकल्याणी परिवार, करमाळा, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आणि सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या माध्यमातून व्यापक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page