जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूल मध्ये “वाचन दिन” साजरा

जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)-
१५ ऑक्टोबर हा दिवस डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्याविषयी इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांचे एक तास वाचन घेण्यात आले. तसेच यावेळी भारत प्रायमरी मधील शिक्षकांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. एकदा वाचलेले आयुष्यभर लक्षात राहते परंतु मोबाईलवर कितीही गोष्टी पाहिल्यानंतर त्या लक्षात राहत नाही यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी नमूद केले.
पुढील काळात दररोज थोडे थोडे वाचन करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आजचा दिवस हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच दररोज वेळोवेळी हात होण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
यावेळी भारतामध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.



