जेऊर येथील कुलकर्णी कुटुंबीयांचा केदारनाथ येथील श्री बद्री केदारनाथ दर्शन देणारा देखावा’

जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील प्रेमनाथ कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जर वर्षी प्रमाणे यावर्षीही गौरी-गणपती समोर देखावा सादर केला आहे.
कुलकर्णी कुटुंबाने यावर्षी श्री केदारनाथ येथील श्री बद्री केदारनाथ मंदिर प्रतिकृतीचा देखावा सादर केला आहे. या सजावटी मुळे जेऊर परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. जर वर्षी प्रमाणे यावर्षीही श्री कुलकर्णी यांनी आकर्षक देखावा सादर केला आहे.
यासाठी शितल कुलकर्णी, मनिषा उघडे, कु समृद्धी उघडे आणि निधी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले आहे.
गेल्यावर्षी कुलकर्णी कुटुंबीयांनी श्री पंढरपूर दर्शन तर दोन वर्षांपूर्वी पर्यावरण संरक्षण आणि नारी शक्तीचा देखावा सादर केला होता. यातून झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, नारी शक्ती चा संदेश देण्यात आला होता.





