October 9, 2026

कुंभेज: पवार वस्ती येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0
IMG-20230221-WA0014.jpg
हॉटेल शिवम प्राईड, शेलगावं.

करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील पवार वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक झिंजाडे सर यांनी केले. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने झिंजाडे सर यांनी आपले मनोगत व शाळेविषयी समस्या पालकां समोर मांडल्या. त्यानंतर अंगणवाडी सेविका आशा चांदणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल व अंगणवाडी मुलांच्या बाबतीत मार्गदर्शन केले. त्यानंतर गुरुदास सुर्वे, नितीन भोसले यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी उपस्थित गुरुदास सुर्वे, सौदागर सुर्वे, नितीन भोसले, भारत पवार, रामेश्वर पवार, हारुण पठाण, शाळेतील मुख्याध्यापक अमृळे, झिंजाडे सर, अंगणवाडी सेविका आशा चांदणे, ताई पवार तसेच वस्तीवरील अनेक ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी यांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page