जेऊर येथील सार्थक शिरसकर या चिमुकल्याचे आकस्मिक निधन; गावावर शोककळा

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील सार्थक (गुड्डू) सोमनाथ शिरस्कर (वय 10) याचे आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून निधन झाले आहे.
चि. सार्थक हा चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूल मध्ये इयता चौथी मध्ये शिकत होता. त्याच्या निधनामुळे जेऊर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा, चुलता, चुलती, आत्या असा परिवार आहे.

