August 4, 2026

जेऊर येथील प्रा. डॉ. प्राजक्ता गोडसे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची पीएचडी प्रदान

0
image_editor_output_image-1575345126-1785849701902.jpg

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील डॉ. प्राजक्ता मीरा आबासाहेब गोडसे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ यांच्याकडून आंतरविद्याशाखीय (शिक्षणशास्त्र) विषयातील Ph.D (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. प्राजक्ता गोडसे यांना कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी या संशोधन केंद्रातील डॉ.एम.व्ही.मते सरांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ.प्राजक्ता गोडसे यांच्या संशोधनाचा विषय ‘पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील गुणवत्तावृद्धीसाठी समाजमाध्यमे आधारित उपक्रमांचे विकसन’असा होता. माध्यमिक शाळेच्या गुणवत्तेवर समाजमाध्यमांचा होणारा प्रभाव त्यांनी संशोधनातून सखोलपणे उलगडला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचेे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देवडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. पी. शिखरे, डॉ. एम. एस. डिसले, संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. एम. टी. मते, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, सर्व संशोधक मार्गदर्शक, शिक्षक, सहकारी, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ.प्राजक्ता गोडसे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जेऊर परिसरात त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या संशोधन प्रवासात त्यांना वडील आबासाहेब गोडसे व आई मीरा गोडसे यांचा बहुमोल पाठिंबा लाभला. तसेच त्यांचे पती तुकाराम नवत्रे-पाटील यांच्या सहकार्यामुळे संशोधनाचे काम सहज पार करता आले.

डॉ. प्राजक्ता गोडसे सध्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिकशिक्षण विभागात यशवंतराव चव्हाण माध्यमिक शिक्षिका असून त्यांचे शिक्षण डी.एड.,बी.एड, एम.एड., डबल ग्रॅज्युएट, डबल पोस्ट ग्रॅज्युएट, डी.एस.एम, नेट सेट व पी.एच.डी झाले आहे.

त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत सहभाग घेतलेला असून त्यांचे अनेक संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page