भारत हायस्कूलच्या सुमित सरक ची राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड


जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-
जेऊरच्या भारत हायस्कूलच्या सुमित सरक ची राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 21 आणि 22 डिसेबर दरम्यान टेंभूर्णी येथील महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये पुणे विभागीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत भारत हायस्कूल जेऊर येथील इयत्ता आठवीत असलेल्या सुमित सरक हा 14 वर्ष आतील मुलाच्या गटात सहभागी झाला होता त्या मध्ये तो विजयी झाला असून त्याची उदगीर येथे दिनांक 29 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
सुमित सरक यास महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोसिएशन चे राज्य सहसचिव आणि आंतररष्ट्रीय पंच पांडुरंग वाघमारे आणि राष्ट्रीय पंच बाळासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडू सुमित तसेच मार्गदर्शक शिक्षक पांडुरंग वाघमारे आणि बाळासाहेब शिंदे यांचे अभिनंदन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिल गादिया, सचिव प्रा. अर्जूनराव सरक, सरपंच पृथ्वीराज पाटील, संस्था सदस्य सुनील तळेकर, प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य नागेश कांबळे, पर्यवेक्षक बी एस शिंदे सर्व संस्था सदस्य प्रशालेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
- नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक
- ३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव
- इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे
- कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन


