जेऊर येथील जेष्ठ व्यापारी गौतमशेठ लुंकड यांचे निधन

जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील गौतम गारमेंटचे मालक गौतमशेठ लुंकड (वय-८७) यांचे आज वृध्दपकाळाने निधन झाले आहे. गौतमशेठ यांनी संथारा व्रत धारण केले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, नातसून असा परिवार आहे. आनंद पतसंस्थेचे माजी चेअरमन अभयराज लुंकड आणि व्यापारी भूषण लुंकड यांचे ते वडील होते. त्यांच्यावर आज दुपारी जेऊर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.