29/06/2026

“जिथे सेवा निस्वार्थ असते, तिथेच समाजरत्न जन्माला येतात ; अनिल कादगे हे त्याचे प्रेरणादायी उदाहरण- प्रा. डॉ. गणेश करे-पाटील

0
IMG-20260629-WA0000.jpg

शहिद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-

करमाळा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. अनिल कादगे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या समाजहिताच्या विविध उपक्रमांची दखल घेत यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘समाजरत्न पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षणतज्ज्ञ मा. प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मा. अनिल कादगे यांनी समाजसेवेचा वसा जपत शिक्षण, रक्तदान चळवळ, आरोग्य, पर्यावरण व सामाजिक बांधिलकीच्या अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनी नुकतेच शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मरणार्थ दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथे सुमारे ₹६५,००० किमतीचा आर.ओ. वॉटर फिल्टर प्लांट भेट दिला.
या उपक्रमामुळे कुंभेज, पोफळज, हजारवाडी, कोंढेज व जेऊरवाडी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे.
जेथे निःस्वार्थ सेवा असते तेथे समाजरत्न जन्म घेतात असे प्रतिपादन डॉ करे पाटील यांनी केले पुढे ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संवर्धनासाठी केलेले हे कार्य अत्यंत मोलाचे असून सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मत प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले.

पुरस्कार स्वीकारताना श्री. अनिल कादगे यांनी हा सन्मान समाजातील सर्व सहकाऱ्यांचा असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजोपयोगी कार्यांसाठी पुढेही योगदान देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी कर्नल सुनील राजदेव, ह भ प. एड. डॉ. बाबुराव हिरडे, स्वामी समर्थ मंदिर समिती अक्कलकोटचे विश्वस्त भारतराव शिंदे पाटील, युवा कीर्तनकार माऊली महाराज पठाडे, मुख्याध्यापक हनुमंत पाटील, अरविंद निलंगे, सोनामाता काटे, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे , सुभेदार मेजर बिभीषण कन्हेरे, प्रा. विष्णू शिंदे, मेजर सुभाष मुटके, मा सैनिक किरण ढेरे, रवींद्र सव्वासे , रवी काटे, आबा काटे, भारत काटे, शहीद जवान परिवार उपस्थित होते

यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी श्री. कादगे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page