जेऊर येथील डॉ हनुमंत निर्मळ यांचे निधन
जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील विश्वनिर्मळ आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म रिसर्च सेंटर चे मालक डॉ हनुमंत हिरामण निर्मळ (वय ६१) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून असा परिवार होता. आज दुपारी जेऊर येथील निर्मळ वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
डॉ वैभव आणि डॉ ऋषिकेश यांचे ते वडील होते.




