September 19, 2026

करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला

0
image_editor_output_image-1495662792-1789807450376.jpg

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-

येथील सर्वोदय प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधत ११ व्या बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. नेहमीच यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित केली जातात.

यावर्षी दि. १९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर असे सलग तीन दिवस, तीन पुष्पअसलेली ही व्याख्यानमाला करमाळा शहरातील विजयश्री सभागृह,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे दररोज सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार असल्याचे प्रतिष्ठाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या व्याख्यानमालेमध्ये,
पहिले पुष्प – शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी मुंबई येथील कवी, लेखक व चित्रपट कथालेखक चला हवा येऊ द्या फ्रेम प्रसिद्ध साहित्यिक अरविंद जगताप यांचे गोष्ट छोटी डोंगराएवढी या विषयावर.

दुसरे पुष्प- रविवार दि. २० सप्टेंबर रोजी पुणे येथे प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांचे “एक भाकर तीन चुली” या विषयावर

तिसरे पुष्प – सोमवार दि. २१ सप्टेंबर रोजी माजलगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रभाकर साळेगावकर यांचे “क्रिएटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी” या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

तरी, करमाळा तालुक्यातील व परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक व रसिकांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण, सचिव अमरजीत साळुंके यांचे सह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page