October 4, 2026

भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न

0
IMG-20261003-WA0002.jpg

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन भारत शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर चे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य संजयकुमार दोशी, भारत हायस्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गोकुळ पाटील, क्रीडा अधिकारी रणदिवे साहेब, उपप्राचार्य नागेश कांबळे, पर्यवेक्षक रविकिरण वाघमोडे, राष्ट्रीय पंच बाळासाहेब शिंदे, श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सत्यजित शिंदे, श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पंकज शिंदे, अमित जिनसावले, सुजय गोडबोले, बाळासाहेब सरक, फुले सर, दत्ता वाघमोडे, महेश मारकड, संजय राजेघोरपडे, रेवणनाथ आदलिंग, आदी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विविध तालुक्यातून मल्लखांब खेळाडू प्रशिक्षक पालक मोठ्या उत्साहाने सहभागी होते उपस्थित सर्व मान्यवरांचे स्पर्धा संचालक पांडुरंग वाघमारे यांनी सर्वांचे स्वागत केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page